CSR , RSS आणि BAT

CSR , RSS आणि BAT 

मला आठवतंय माझ्या लहानपणी मी चिन्मय , तन्मय , नचिकेत आणि अभिषेक यांच्या बरोबर क्रिकेट खेळायचो , त्या बिचाऱ्यांची बॅट तुटली होती , मी नवीन बॅट आणली ... आणि तन्मय ने नवीन नियम सांगितला ... नवीन आणलेली बॅट जरी तुझी असली तरी , ती फक्त कॅप्टन चिन्मय कडेच राहील ... 
मी नंतर अमोल , इरफान , सोमनाथ , मुन्ना असे मित्र मिळेपर्यंत मी सापशिडी खेळत होतो ....
              अहो !! आज जे आज जे कॉर्पोरे रिस्पॉन्सिबिलिटी ,च्या बाबतीत बघायला मिळतय ... ही यांची , संघाची जुनीच खोड आहे 
ह्यांच्यात अधिकार , पैसा , ह्याचे केंद्रीकरण कुटंब प्रमुखाकडे करून त्याच्यामार्फत पाहिजे तसा वाटला जातो . ह्या लोकांना  कोणत्याही प्रकारचे विकेंद्रीकरण नको असते ..... 

त्या चिन्मय ला बॅट माझी पाहिजे होती , तसा ह्यांना सगळा टॅक्स केंद्रालाच पाहिजे . राज्ये सरकारे भिकारी झाली तरी चालतील ... आधी GST ची थकबाकी दिली नाही आत्ता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आलेला फंड कंपन्यांच्या कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सीएसआर खर्चात ग्राह्य धरण्यात येणार नाहीत ... तो ग्राह्य फक्त पीएम केअर्समध्ये धरणार त्यामुळे साहजिकच सगळ्या कंपन्या तिकडेच ओढ घेणार .... हा दुजाभाव कश्यासाठी ??? 
त्यामुळे लवकर पुढच्या निवडणुकीत अमोल , इरफान , सोमनाथ  असे चांगले सर्वसमावेशक मित्र पकडा ... आणि देश वाचवा !!! 
समझने वाले को इशारा काफी है !! 

......✍️निखिल थोरवे

Comments

Post a Comment