हा डोस पोलिओ पेक्षा सुद्धा आवश्यक
हा डोस पोलिओ पेक्षा सुद्धा आवश्यक !!!!
इयत्ता चौथी मध्ये शिवछत्रपतींचा इतिहास शिकवल्यावर , लगेच पाचवी मध्ये शाहू , फुले , आंबेडकरांचा सखोल इतिहास अभ्यासक्रमात सोप्प्या भाषेत समाविष्ठ केल्यास महाराष्ट्रातील विखारी जातीवाद कमी होण्यास मदत होईल . निदान खोट्या भूमिका पेरून पोरांना फसविण्याचे धंदे तरी बंद होतील ... दुर्दैव हेच आहे की , आपले महापुरुष जातीच्या शृंखलेमध्ये अडकून राहिले आहेत . सध्या आपल्याला काय दिसते , महात्मा फुले माळ्यांचे , आंबेडकर दलितांचे , अहिल्याबाई धनगरांच्या , लहुजी वस्ताद आणि अण्णा भाऊ साठे मातंग समाजाचे ... ह्यात बहुतांश लोकांचा दोष आहे असे अजिबातच नाही ..
तुम्ही जर त्यांना शाहू , फुले आंबेडकर 4 ओळीत सांगणार असाल तर हे असे होणारच !!!
जर , तुम्ही त्यांना लहानपणीच ह्या गोष्टी बिंबविल्या की , फुलेंचे कार्य सर्व समाजासाठी होते , आंबेडकरांनी घटना सर्व नागरिकांच्या हक्कांचा विचार करून लिहली , अहिल्याबाई होळकरांनी मंदिरांबरोबर पाण्याच्या टाक्या , तलाव देखील बांधले
हे जर पोरांना , पोरींना लहान वयात समजले तर कोरेगाव भीमा सारख्या घटना घडतीलच कश्या ??? आणि घडल्या जरी त्यात अपप्रचाराला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय कमी असणार एवढं नक्की !!!
बरेचसे जण इयत्ता चौथी मध्ये शिकतात तेवढेच छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवतात . त्यानंतर ना अधिक काही वाचतात ना त्यांच्या दैनंदिन कामातून त्यांना वेळ मिळतो . पण तरी शिवचरित्र त्यांच्या जीवनात सखोल परिणाम करून असते .
असेच जर पाचवी मध्ये आपण शाहू , फुले दाम्पत्य आणि आंबेडकर आणि इतर सर्वच महान समाजसुधारक त्यांना समजून सांगितले तर महाराष्ट्रात केवढा फरक पडेल ???
आज फुले जयंती , 14 तारखेला आंबेडकर जयंती येत आहे ... आज ह्या निमित्ताने सविस्तर बराच दिवस डोक्यात घोळत असलेला विचार मांडतोय ...
तुमचं मत सांगा ......
......✍️निखिल थोरवे
Comments
Post a Comment