भाजपा स्वतःस राष्ट्र समजत आहे काय ???

1.सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनुभवी नसून कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी अनुभवी देवेंद्र फडणवीस पाहिजे असा  #DevendraForCM हा हॅशटॅग ट्रेंड करणे .

2.राज्यातील भाजपच्या नेत्यांनी राज्य आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे हे माहीत असून देखील आणि GST परतावा राज्याला दिलेला नाही हे माहीत असून देखील , CM Relif Fund ला मदत न देता , PM Cares फंडाला मदत  देणे आणि तसे आव्हाहन करणे (ज्यावरून सोशल मीडिया ह्या नेत्यांचा समाचार घेत आहेच 😂😂)

3.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मरकझ प्रकरणाच्या परवानगी वरून केंद्र सरकारला जाब विचारताच , पद्धतशीर पणे लष्कर-ए देवेंद्र  कडून  वाधवान प्रकरण उजेडात आणणे .

4..वांद्रे स्टेशन वर पद्धतशीर पणे 2000 लोकांचा जमाव जमवणे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आणि त्या लोकांच्या सुद्धा आरोग्याचा प्रश्न निर्माण करणे 

5.मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा प्रश्न राज्यपाल दरबारी असताना , राज भवनावर जाऊन कांड्याळा करणे , आणि एवढ्यावर न थांबता भाजप चे प्रदेश सचिव राजेश पिल्लई यांच्या मार्फत मा.उच्च न्यायालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वैधते विषयी शंका उपस्थित करून याचिका दाखल करणे 


आणि एवढ्या सगळ्या कांडाळीचा परिणाम होताना दिसत नसताना भाजपने आत्ता त्यांचा हुकमी एक्का काढला 
धार्मिक द्वेष , ज्याची ट्राईल त्यांनी मरकझ प्रकरणात आपल्या कुप्रसिद्ध IT Cell च्या साहाय्याने घेतलीच .. होती 

आत्ता त्याला अधिक व्यापक रूप देताना दिसते आहे , तुम्हाला आत्ता काही दिवस फेसबुक , न्युज चॅनेल वर फक्त पालघर , पालघर च दिसेल .. 

आदिवासी लोकांनी ,  मुलं पळवतात आणि आत्ता अश्या बातम्या येत आहेत की , जमिनीच्या वादातून 2 साधू आणि त्यांचा ड्रायव्हर ह्यांची हत्या केली . 2 दिवस काही घडले नाही पण बरोबर काल दुपारी भाजपचा IT Cell ऍक्टिव्ह झाला .आणि ज्यांनी पालघर पाहिले पण नसेल अश्या हिंदी भाषिक लोकांनी ट्विट्स चालू केले , ब्लर करून व्हिडिओ पोस्ट करणे सुरू केले .
                        राष्ट्रीय पातळीवर स्वतः भाजपचे अध्यक्ष , पदाधिकारी , राज्यातील नेते फडणवीस कुणीच मागे नव्हतं , राज्यातील सरकार पर्यायाने उद्धव ठाकरे , अजित पवार आणि शरद पवार हे राज्यातील हिंदूंचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा असा सगळा सूर ... 
मी अनेकदा पालघरला गेलोय , तो गुजरातच्या नजीकचा आदिवासी भाग आहे ,अर्थात तो काही मुस्लिम बहुल भाग नाही , वास्तविक मॉब लिचिंगला जबाबदार असणाऱ्यांना पोलिसांनी कधीच ताब्यात घेतले आहे , ते का झाले ?? 
 त्याची कारणे नेमकी आत्ता उजेडात येत आहेत .. तरीसुद्धा जाणीवपूर्वक राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा तापवला जाऊन महाराष्ट्र सरकार वर दबाव वाढवला जाऊन सरकारला अडचणीत आणणे पद्धतशीरपणे चालू आहे 

मध्यप्रदेश मध्ये जे जमलं ते महाराष्ट्रात जमणार नाही म्हणून कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर भाजपने जाणीवपूर्वक केलेले हे प्रयत्न  , आणि त्यांची उजळणी मी वर केली. 

तुम्ही या सगळ्याचा सिक्वेन्स लक्षात घ्या .. आणि भाजपच्या निचपणाचा तुम्हाला अंदाज येत जाईल 

एखादे राज्य , आणि राष्ट्र अडचणीत असताना राजकारण बाजूला ठेवावे ही साधा नैतिकता उठता-बसता राम नामाचा जप करणाऱ्या भाजपला जर समजत नसेल , तर हे रामाचे नाही तर मनुचे अनुयायी आहेत हे स्पष्टच आहे 
मनुस्मृती मध्ये लिहलेल्या राज्य बळकवण्यासाठी , आणि शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी लिहलेल्या प्रत्येक उपायांचा अवलंब भाजपा करत आहे .

खरं तर भाजपचा अहंकार एवढा वाढला आहे की , त्यांना स्वतः शिवाय दुसरे कुणी सत्तेवर नकोच आहे . भाजप आत्ता मानसिक दृष्ट्या अश्या अवस्थेमध्ये पोहोचले आहे की , आम्हीच स्वतः एक राष्ट्र आहोत !!! 

अश्या प्रवृत्ती या पूर्वी भारताने आणि विशेषतः महाराष्ट्राने ह्या महाराष्ट्राच्याच मातीत गाडल्या आहेत . कुणाला बघायचे असेल तर खुलताबादला जाऊन औरंगजेबाची कबर बघून या !! 

जो स्वतःला राष्ट्रापेक्षा मोठा समजतो , त्याचा सर्वनाश अटळ असतो !! 

 जय हिंद !! जय महाराष्ट्र !!! 

....✍️निखिल थोरवे 

Comments