राष्ट्राला दिशादर्शक :- महाराष्ट्र धर्म

अकबर बादशहा मुघल साम्राज्य विस्तारत होता , तेव्हा स्वतःला उच्च कुलीन रजपूत म्हणवणारे स्वतःचे राज्य वाचविण्यासाठी स्वतःच्या मुली मुघलांना विवाह करून देत होते. 
आदिलशाही , निझामशाही , कुतुबशाही ह्या शाह्या , यादव राजा कृष्णदेवराय याच्या नंतर जवळ जवळ 300 वर्षे महाराष्ट्राच्या छाताडावर बसून होती पण महाराष्ट्राने कधी ह्या जुलमी शाह्याशी बेटी सौदा केला नाही . 
शेवटी ह्या महाराष्ट्रातच तेजस्वी महापुरुष शिवछत्रपती जन्मले आणि त्यांनी स्वराज्य , स्वदेश , स्वधर्म ह्या विषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण केली . आणि पुढे त्यांच्याच वंशजांनी  मुघल सत्तेला नेस्तनाबूत करून त्याच्या मृतपाय शरीरावर आपले साम्राज्य उभे केले . इंग्रजी सत्तेला शेवटची टक्कर देणारे मराठेच होते .. इथवर मराठी सत्ता पोहोचली हेच त्यांचे असीम यश आणि कर्तृत्व !! 

                        आधुनिक काळात स्वातंत्र्य लढा , अर्ज विनंत्या , अश्या मवाळ भूमिकेत होता आणि स्वातंत्र्य हा शब्द उच्चारणे सुद्धा स्वप्ननातीत होते अश्या वेळेस " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच " अशी सिंहगर्जना महाराष्ट्राच्याच महापुरुषाने केली . आणि स्वातंत्र्य लढ्याला धार आणली .. पुढे स्वातंत्र्य लढा त्याच मार्गावर मार्गस्थ झाला . हा इतिहास आपल्याला न्यात आहे .
                        स्त्री शिक्षण हा शब्द उच्चरायचा म्हंटला तरी लोकांना महापाप केल्या सारखे वाटायचे अश्या वेळेस महात्मा फुले , सावित्रीबाई फुलेंनी कंबर कसली आणि देशाचा इतिहास पालटला तो कायमचाच !! अस्पृश्यता चळवळ ज्यांनी वेगळ्या उंचीवर नेली ज्यांनी संबंध भारताला मुक्ती मार्ग दाखवला ते महाराष्ट्राचेच सुपुत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर !! 

                       महाराष्ट्राच्या ह्या महापुरुषांची उजळणी मी करण्याचे कारण , का तर ?? 

महाराष्ट्र नेहमी राष्ट्राला अनादी काळापासून दिशा देत राहतो , काळ , वेळ , प्रसंग , लढा कोणताही असो . जे जे अधिक उत्तम ते सर्वात आधी महाराष्ट्राने ग्रहण केले . जे जे अधिक राष्ट्रहिताचे ते महाराष्ट्रने सर्वांत आधी ओळखले . महाराष्ट्र देशाला लढायला शिकवतो . म्हणून ते महान राष्ट्र आहे . 

मोदी शहा ची सत्तेची मस्ती , माज जिरू शकतो , हे महाराष्ट्राने दाखवून दिले . राजकीय पंडितांच्या मते अश्यक असताना तीन पक्ष येऊन सर्वात मोठ्या पक्षाला ज्यांनी सत्तेपासून दूर ठेवणे ! हा साधा पराक्रम होता काय ??? 

जे वाईट आणि खराब ते महाराष्ट्राने नक्की दूर केले . काळाच्या ओघात ते स्पष्ट झाले , सध्याच्या घडीला संकट मोठे असताना सरकारला भाजप कसे अडचणीत आणत आहे ह्या विषयी मी माझ्या मागील ब्लॉग मध्ये मागे लिहलेच पुन्हा त्याची उजळणी करत नाही . 

पण काल झालेले तथाकथित अर्णब गोस्वामी प्रकरण , जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दल आक्षेपार्ह फोटो टाकणारा मोदी भक्त ह्यांना शिक्षा कशी केली पाहिजे , ह्यांना लथाडले कसे पाहिजे ह्याचा वस्तुपाठ महाराष्ट्राने पुन्हा घालून दिला आहे . 

तुम्ही भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या वॉल पोस्ट वर जावा , तुम्हाला कंमेंट्स वाचून समजून जाईल महाराष्ट्राचा मूड काय आहे सध्या !!! 
ते काय पेड ट्रॉलर्स नाही तो महाराष्ट्रामधला सर्व सामान्य युवक आहे . ज्याला सर्व समजते .जो कधी धर्म , जातीच्या विषारी अपप्रचाराला बळी पडत नाही . त्याला वारसा शाहू , फुले , आंबेडकरांचा आहे . 

ज्याला पत्रकारिता आणि दलाली ह्यातील फरक कळतो 
ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बदनामी ह्यातील अंतर समजते .

ज्याला भाजपा नेत्यांच्या लबाड , लांडाल्या समजतात त्यांचा दुटप्पीपणा समजतो . 
संघ विचार कधी महाराष्ट्रत रुजला नाहीच . तो फक्त काही पेठा , काही आडनावे ह्यांच्या पर्यंतच मर्यादित राहिला . आणि जिथं संघ पोहोचला नाही तिथं शिव प्रतिष्ठान पोहोचले . बहुतांशी बहुजन  युवक नासवायचे ज्यांनी काम केले . असो त्या खोलात आत्ता सध्या जात नाही . नाहीतर खूप विषयांतर होईल 

पण अर्णब गोस्वामी (तथाकथित) हल्ला (??) प्रकरणाचे दुःख पुण्यातील काही विशिष्ट पेठा आणि आडनावांना अधिक आहे . जे दुःख गौरी लंकेश , दाभोलकर , कलबुर्गी , कॉम्रेड गोविंद पानसरे ह्यांच्या हत्येच्या वेळेस कधी समोर आले नाहीत .
एखाद्याला संमोहित करून त्याला रेग्युलर बेसस वर भक्तीची पाठशाळा शिकवायची ह्या शाळेतील अर्णब हा मास्टर आहे . आकांड तांडाव , चढा आवाज म्हणजे पत्रकारिता हा त्याचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास ! ज्याचा परदा फार्स कुणाल कामरा ने नुकताच केला . अर्णब केवळ पोकळ , भपंक , पत्रकार होताच पण तो भाजपचा भडवा आहे हे स्पष्टपणे सांगणारा कुणाल कामरा पहिला होता .. 
अनियंत्रित सत्तेला लष्करी उठावापेक्षा कलाकारांची भीती अधिक वाटते ह्याला इतिहास साक्षी अनेकदा राहिला आहे . 

डेव्हिड लॉ प्रसिद्ध व्यंगचित्रकार यांना ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल टरकून असायचे . त्यांचा व्यंगचित्रांचे फटकारे अधिक जालीम उपाय असायचा आणि मुळात प्रत्येक उठावाची सुरुवात ही कलाकार मंडळीच करतात , हा जगाचा इतिहास आहे . भारतात त्याची सुरुवात झाली आहे हे आपल्याला जाणवत असतेच !

एकंदरीत बदलेल्या स्थितीत महाराष्ट्र देशाला दिशादर्शक ठरतोय , हे स्पष्ट आहेच. त्याचे दृश्य परिणाम जरी मीडिया किंवा वर्तमानपत्रे ह्यांच्या मार्फत दिसत नसला तरी , सोशल मीडिया च्या माध्यमातून तो दिसतोय व त्यातून जनतेचा कल स्पष्ट दिसून येतोय . आणि ह्याच्या निव्वळ उलट परिणाम तुम्ही ट्विटर बघता तिथं आहे . बहुतांशी लोकं भारतामधील बदलेल्या परिस्थिती मध्ये अजून अंधारातच चाचपडत असताना महाराष्ट्राच्या युवकांचा हा पवित्रा पुन्हा त्याच जुन्या काळाची आठवण करून दिल्याशिवाय रहात नाही 
फॅसिस्ट विचारसरणी , टोकाची धर्मांध विचारसरणी ह्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वच थरातील युवकांनी दंड थोपटले आहे ... हे नक्कीच सुखावणारे चित्र आहे 

एकूणच काय , 

मराठा तितुका मेळवावा 
महाराष्ट्र धर्म वाढवावा 
देशाची मार्गदर्शक ठरावा  
महाराष्ट्र माझा....!!! 

....✍️ निखिल सुभाष थोरवे 

                        




                        

Comments

Post a Comment