आश्चर्यकारक निकालाचे कंगोरे
महाराष्ट्र विधानसभेचा आजवरचा सर्वांत धक्कादायक निकाल लागला. अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच्या लोकसभेला जयजयकार झालेल्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला . महाविकास आघाडीच्या पराभवाला अनेक कंगोरे असले तरी , एवढा सुपडा साफ होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निश्चित नव्हती. मग नेमके हे अघटित घडले कसे याच्या खोलात गेले तर , त्याची काही उत्तरे मिळतील. १) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ट्रॅप करणे शेवटपर्यंत महाविकास आघाडीला जमलेच नाही :- सुरुवातीला या योजनेला , आर्थिक उधळपट्टी हिणवुन पुन्हा त्याच योजनेचे पैसे आपल्या जाहीरनाम्यात वाढवून एकप्रकारे महाविकास आघाडीने आपल्या डोक्यातील गोंधळ जगजाहीर केला. आणि तोच खरे म्हणजे नडला. महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणि त्यातील आश्वासने ही लबाडाच्या घरची आमंत्रणे आहेत हे लाडक्या बहिणींनी ओळखले. २) हिंदुत्व इज न्यू नॉर्मल इन महाराष्ट्र :- हो..! कधीकाळी महाराष्ट्रात धार्मिक सहिष्णुता पाळली जायची. स्वतःच्या धार्मिक बाबींचा उच्छाद मांडला जात नव्हता. कितीही नाकारले तरी , धार्मिक बाबींना एक सांकेतिक 'चौकट' होती. यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत ही ...