शिवछत्रपती : आज , उद्या आणि परवा
लेखक :- निखिल सुभाष थोरवे
प्रत्येक महापुरुष काळाच्या कसोटीवर जोखला जातो . शिवकाळ , शिवचरित्र , शिवछत्रपती ह्यास अपवाद नाही असे म्हणणार नाही . कारण ,
" मुळात शिवाजी महाराज होऊन गेले ! तो इतिहास झाला आत्ता त्याचे काय ?? "
" पुढचं काय ते बोला !! आत्ताच्या घडीचा काय ते बोला !!! "
" त्यांच्या नावाचा जयघोष करून करून घसा कोरडा होईल पण शिवाजी राजे परत येणार नाही . "
ही व्यावहारिक भूमिका ही मंडळी मांडताना आपण सर्व जण बघतो . एक युक्तिवाद म्हणून बघायला गेले तर हा युक्तिवाद अतिशय बिनतोड आहे . कारण वस्तुस्थिती तेच सांगते .
आज महाराष्ट्रातील युवकांची बहुतांश संख्या इतिहासात रमलेली आहे . काही जण शिवव्याखाते आहेत , काही जण दुर्ग संवर्धनाचे काम करतायेत . काही जण इतिहास संशोधनात आहेत . ह्या मंडळींना माझा मनापासून सलाम आहेच . कारण समाजाची एक तरुण पिढी जी युट्युब , फेसबुक पेजच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात इतिहासाची जागृती करीत आहे . अगदी इतिहासातील पूर्वी माहीत नसलेल्या गोष्टी ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत . ही अतिशय आनंदाची बाब आहे . असे एकीकडे होत असताना महाराष्ट्रातील युवकांचा एक मोठा वर्ग हा केवळ शिवाजी महाराजांच्या अंधभक्तिमध्ये व्यस्त असल्याचे आपण बघतो . शिवरायांच्या सारखी केशभूषा करणे असेल . किंवा त्यांचे नाव वापरून इतर उद्योग करणे असेल . त्यापैकी एक प्रकरण नुकतेच जुन्नर मध्ये आपण बघितले . असो त्या गोष्टींच्या खोलात जाण्याची ही वेळ नाही पण ,
सांगायचा मुद्दा एवढाच की , इतिहासात रमून राहिलेले राष्ट्र कधी मोठी झेप घेत नाही . ते त्या ज्वाज्वल्य इतिहासाच्या कोशात असे काही गुरफुटून जाते की , त्याला वस्तुस्थितीचा विसर पडतो . घडणाऱ्या प्रत्येक घटनेला त्या राष्ट्रातील लोकं इतिहासाच्या मोजमापात टाकायला बघतात . तत्कालीन परिस्थिती नुसार वापरण्यात आलेल्या गोष्टी , संज्ञा ह्या आजच्या सांगाड्यात फिट्ट करायला लागतात आणि त्यातून निर्माण होतो तो गोंधळ आणि ह्याच गोंधळात आपला वर्तमान आणि पर्यायाने भविष्यकाळ हळू हळू लुप्त होत जातो . सुरुवातीला ही हानी व्यक्तिगत पातळीवर असते . नंतर ती राष्ट्रव्यापी रूप घेते . महाराष्ट्र देखील अश्याच काहीश्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असल्याचे मला स्पष्ट दिसत आहे . एकंदरीतच इतिहासाचा सार्थ अभिमान धरणे आणि इतिहासात रमून वर्तमान आणि भविष्यकाळ खराब करणे असा एकंदरीत प्रकार महाराष्ट्रात फोफावतो आहे . भविष्य आणि वर्तमानासाठी आपल्या सुवर्णमय इतिहासपर्वाचा आपण इंधन म्हणून वापर करून घ्यायला हवा . हीच भूमिका मांडण्यासाठीच हा ब्लॉग प्रपंच !!!
माझ्या मते इतिहास अडगळीत पडलेल्या ट्रान्झिस्टर सारखा आहे . तो पोटमाळ्यावरून काढला आणि लगेच वापरायला चालू केला असे होत नाही . आधी तो साफ करावा लागतो . दुरुस्त करून घ्यावा लागतो . त्याचा चॅनेल सेट करावा लागतो . आणि मग तो मर्यादित प्रमाणात वापरता येतो .
शिवकालीन इतिहासाचे असेच आहे . शिवाजी महाराज तुम्ही जसे च्या तसे वापराल तर गझहब घडेल . उदाहरणच देतो . तलवारीच्या जोरावर छत्रपतींनी बादशाह्या पालथ्या घातल्या . आधुनिक लोकशाही काळात ते शक्य आहे का ??
जुलमी लोकनियुक्त शासन कितीही अन्यायकारक निर्णय राबवत असले तरी , त्याचा निषेध करण्याच्या पद्धती ह्या आधुनिक काळात रूढ झाल्या. एखाद्या मंत्र्यांचा निर्णय पटला नाही तर त्याविरुद्ध आपण त्याचा खून नाही करू शकत . त्याला आंदोलनाची एक अभिजात पद्धत आली आहे . आणि ती कालसापेक्ष आहे . आणि म्हणूनच आपल्या पैकी काही जणांनी हाच कालसुसंगतपणा न दाखवल्यामुळे मी वर बोललो तसा काही जण ,
शिवछत्रपतींच्या आजच्या काळात काय काम ? असा युक्तिवाद मांडतात . ते चुकीचे नाहीत . चुकीचे आहोत आपण !! कारण राज्यकारभार , युद्धनीती , अर्थव्यवस्था , सामाजिक न्याय , ह्या निकषांवर शिवछत्रपतींचे निर्णय त्यांचे कर्तृत्व आपल्याला सध्याच्या जमान्यातील साच्यात बसवून ते मांडावे लागेल . तरच ते आपण वापरू शकतो .
त्यांनी " हिंदवी " स्वराज्य उभे केले . आपण सर्व युवक मिळून "उद्योगी" स्वराज्य उभे करु शकतो .
मराठी तरुण तरुणींची मक्तेदारी सर्व ठिकाणी वाढवू शकतो . कंबर कसून व्यवसाय उभा करू शकतो . हे शक्य आहे .
बाकी शिवराय स्वतः एक राज्यकर्ते असल्याने बऱ्याच गोष्टी राज्य चालविण्यासाठी राजकारण्यांना साह्यभूत ठरतील हे उघड आहे . त्यामुळे केवळ राजकिय फायदा न बघता . डोळस पणे शिवचरित्र आणि शिवछत्रपती ह्यांचे कडे बघितले की , सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की सापडतील .
मराठी व्याकरण ज्यांनी लिहले ते विष्णुशास्त्री चिपळूणकर एकदा म्हणाले होते , मी मराठी ह्या भाषेचा " शिवाजी " आहे .
म्हणजे ह्याचा अर्थ शिवाजी हे फक्त "कर्तृत्व " नाही , "नेतृत्व" नाही , "वक्तृत्व " नाही तर शिवाजी "ह्या" सगळ्यांचे "सर्वोच्च परिणाम " आहे ..
जर प्रत्येक मराठी युवकाने आपल्या आपल्या क्षेत्रात ठरवले की , मला माझ्या क्षेत्राचा "शिवाजी " होयचंय तर मला नाही वाटत काहीच अश्यक आहे .
आपण मराठी युवक निदान खाली दिलेल्या गोष्टी तरी करू .
१. उच्चशिक्षण घेऊ
२. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करू .
३.जागतिक भाषा इंग्लिश शिकून घेऊ .
४.जागतिक मार्केट मधल्या व्यावसायिक संधी ओळखू त्याच्या मागे लागू .
५.संधी मिळताच आक्रमक , अडचण येताच सौम्य , धूर्त चालाख , वेळप्रसंगी चार पाऊले मागे येण्याची कला शिवचरित्रातुन शिकून घेऊ .
६. जिवंतपणी संभाजी महाराजांचे दिवस घालणाऱ्या शिवछत्रपतीं सारखा विज्ञाननिष्ठा आपल्या अंगात भिनवू !!
७. आऊ साहेबांना सती जाण्यापासून परावृत्त करणाऱ्या छत्रपतींच्या कृतीप्रमाणे स्त्री विषयक पुरोगामी आचरण ठेवू .
८. भूमिपुत्रांना बळकट करू , शिवरायांनी सैन्य बारा मावळातूनच उभे केले . कुठल्या युपी , बिहार च्या भैय्यांवर अवलंबून राहून नाही ना !! त्यामुळे मराठी लोकांनी व्यवसाय केलाच तर भूमिपुत्रांना अधिक प्राधान्य देऊ .
९. शिवरायांच्या प्रमाणे दूरदृष्टीने कोणताही निर्णय घेऊ .
१०. छोटासा का होईना स्वतःचा व्यवसाय नक्की सुरू करू .
माझ्या अल्पबुद्धिने विचार केलेल्या ह्या काही गोष्टी ज्या निश्र्चितच परिपूर्ण नसतील देखील . पण किमान शिवछत्रपतींची कालसापेक्ष सुसंगतता अधिक वाढवणारी आहे . त्यामुळे मी वर लिहल्याप्रमाणे असे प्रश्न कुणी विचारले तर त्यांना आपल्या वागणुकीतून जरूर उत्तर द्याल !! अशी अपेक्षा
कारण ,
छत्रपती सूत्र विश्वाचे !!!!
.........✍️ निखिल सुभाष थोरवे
Very good nikhil sir
ReplyDeleteKeep posting
Thank You So Much...!!
Delete