डिजिटल स्ट्राईक कसले करताय ...?? लष्करी स्ट्राईक करा ...
माझ्या जवळच्या ओळखीचे एक सद्ग्रहस्थ आहेत . त्यांची कुणाबरोबरही भांडणे अथवा वाद झाला की , ते
"माझ्याबरोबर दगाबाजी केली ..."
" आत्ता वेळ खराब आहे , बोलायचे ते बोलून घ्या .. चांगली वेळ येऊद्या एका एकाला बघून घेतो !! "
" तुम्ही कितीही चांगले वागा लोकं धोका देणार म्हणजे देणार ! "
इत्यादी ... इत्यादी .. अश्या प्रकारचे व्हाट्सअप्पला स्टेटस ठेवतात तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सुद्धा अशी लोक नक्की सापडतील ..
अश्या पद्धतीचे व्हाट्सअप्प स्टेटस ठेवल्याने . त्याने नेमके काय साधते !! हा प्रश्न मला नेहमी सतावतो ...
अर्थात अश्या स्टेटसने समोरच्याला काही फरक पडतो का ??
उलट आपली कमकुवत मानसिकता त्यातून व्यक्त होते .
उदाहरण क्रमांक २
लहानपणी शिकवली गेलेली एक महत्वाची गोष्ट ! एखादी रेष छोटी करायची असेल तर सर्वात सोप्पा उपाय त्याशेजारी मोठी रेष काढा !! म्हणजेच समोरच्याला छोटे करून नाही तर , त्याच्यापेक्षा मोठे बनून त्याला धडा शिकवा .
ही दोन उदाहरणे सांगायचा खटाटोप ह्यासाठीच की , सध्याची चीन बद्दल असणारी आपली भूमिका !!
लष्करी कारवाई आणि जमीन बळकविण्याच्या बदल्यात आपण करतोय काय तर , चायनीज मोबाईल वरूनच चायनीज अँप डिलीट करतोय ..वास्तविक आपण वापरात असलेल्या बहुसंख्य अँप आणि स्टार्टअपला फंडिंग चीन मधील इन्व्हेस्टर करतात त्या अँप च काय ??
भक्त तर ट्विटर वर चीनवर "डिजिटल सर्जिकल स्ट्राईक" झाल्याचा जल्लोष करत आहेत . काल सर्वत्र प्रसिद्ध झालेल्या अँप ची यादी ही , राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घातक असल्याचे गुप्तचर खात्याचे म्हणणे आहे .
म्हणजे गलवान वादापूर्वी ही अँप राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक नव्हती का ? तर त्यापूर्वी देखील जरूर होती ..
चीनचे काय तर प्रत्येक मोबाईल अँप हे आपले कॉन्टॅक्ट , गॅलरी , लोकेशन यांचे एक्सेस घेऊन आपली प्रायव्हसी धोक्यात घालत असतेच .. त्यामुळे तुम्ही वेळ कशी साधली लक्षात घ्या ...आणि अमित भाईंच्या भाषेत , क्रोनोलॉजी समजून घ्या...
मुख्य परिस्थिती अशी आहे की , केंद्र सरकार चीन पुढे पूर्ण हतबल आहे . त्यांच्यात चीन वर चाल करून जायची राजकिय इच्छा शक्ती नाही . कधी म्हणायचे घुसखोरी केलीच नाही . कधी म्हणायचे केली . असा सगळा बोटचेपी कारभार आहे .
त्यासंदर्भात गोदी मीडिया आपले काम चोख बजावत आहेच .. उद्या पासून गोदी मीडियावर डिजिटल स्ट्राईक चा प्रपोगंडा चालवला जाईल . त्याला मसाला लावायला मोदी साहेब आज येणार आहेत असे समजले .
त्यातून जसं काय आपण चीन ला हरवले आहे असा अविर्भाव प्रदर्शित केला जाईल ..
चीन विरोधातील देश भावना शांत करण्यासाठी हे चीन अँप बंदीचे नाटक रचले जात आहे .
पण चीन सारख्या कुरापतखोर राष्ट्राला गरज डिजिटल स्ट्राईक ची नाही तर लष्करी स्ट्राईक ची आहे . कारण तुम्ही सैनिकांच्या वीर मरणाचे उत्तर जर , अँप डिलीट करून देणार असाल तर , तुमच्या सारखे कपाळकरंटे तुम्हीच !!
......✍️निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment