खरा मित्र ओळखण्याचा फॉर्म्युला ..
जंगली आणि रानटी प्राणी यांमध्ये सुद्धा मित्रत्व आणि शत्रुत्व असते , मग माणसांमध्ये असे काय खास आहे ??
मुळात आपण ' मित्र ' या गोष्टीची खूप मोघम व्याख्या बनवली आहे
आपले जिम मधले मित्र वेगळे , ऑफिस मधले मित्र वेगळे , कॉलनी मधले मित्र वेगळे , गणपती मंडळामधले मित्र वेगळे , व्यावसायिक भागीदारी मधले मित्र वेगळे ह्या सगळ्यांना आपण
' मित्र ' ह्या एकाच कप्यात बंद केले आहे , सगळेच आपले मित्र असू शकत नाही . आपण फार तर फार ह्यांना सहकारी असे म्हणू शकतो ...
सहकारी आणि मित्र ह्या मध्ये पुसट रेषा आहे ... आणि आपली मित्र ही व्याख्या ही ह्या रेषेच्या अधे मध्ये हेलकावे खात असते
खाली एक फॉर्म्युला सांगितला आज तेवढा फक्त अप्लाय करा आणि आपला खरा मित्र शोधा ..
1)आपण ज्यांच्या बरोबर पार्टी करतो त्यांची नावे बाजूला काढा
2)आपण हॉस्पिटल मध्ये असताना दवाखान्यात कोण कोण बसून होते ह्याची नावे बाजूला काढा
3)आणि सर्वात महत्त्वाचे आपल्याला अडचणीच्या काळात ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे बाजूला काढा
आत्ता ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जी नावे कॉमन असतील (??)
तो कदाचित आपला मित्र असू शकतो !!
माझ्या नशिबाने मला दोन हाताच्या बोटावर मोजण्यासारखे मित्र देवाने दिले त्याबद्दल देवाचा मी खूप आभारी आहे
बाकी युवा मंच , प्रतिष्ठान , मंडळ , चौकातली पोरं ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत
त्यामुळे आपला खरा मित्र आपल्याला मिळो आणि जो मित्र ह्या फॉर्म्युल्यात बसत असेल त्याला टिकवून धरा ह्या सदिच्छा !!
......✍️निखिल थोरवे
Nice one Nikhil..
ReplyDeleteThank you
Delete👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThank you
Delete