होय !! मी काठावरचा हिंदू

होय !! मी काठावरचा हिंदू 

लेखक :- निखिल थोरवे 

पृथ्वीराज चव्हाण यांनी  कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २% व्याज देखील द्यावे अशी सूचना केली.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि एक पूर्वाश्रमीचे पंतप्रधान कार्यालयात काम केलेले मंत्री म्हणून त्यांनी मांडलेली ही सूचना अंत्यत योग्य आहे . 
वास्तविक त्यांनी केलेली सूचना ही चालू सरकारी योजनेचाच भाग आहे. अशा प्रकारची योजना पहिल्यांदा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९८ च्या अणु चाचणीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर १९९९ साली Gold Deposit Scheme  या नावाने सुरू केली होती.  नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदर योजनेचे नाव बदलून Gold Monetization Scheme, २०१५ अशी नवी योजना सुरू केली. 
योजनेच्या पहिल्या वर्षातच देशभरातील ८ मंदिरांनी त्यांचे सोने विविध बँकांमध्ये ठेवले असे अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सांगीतले. यामध्ये शिर्डी तसेच तिरुपती या देवस्थानांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०१५ ते ३१ जानेवारी २०२० पर्यंत या योजने अंतर्गत ११ बँकांमध्ये २०.५ टन सोने जमा झाले आहे. 
 आपल्या देशातील बरेचसे सोने हे व्यवहारात नाही असे वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अहवाल सांगतो. कोविडच्या अभूतपूर्व संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील सोन्याचे योग्य नियोजन आणि विनिमय करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही सूचना केली होती. 
आत्तापर्यंत भारतात दोन प्रधानमंत्र्यांनी सोने कर्ज रूपाने घेण्याची योजना राबविली आहे. योगा-योगाने हे दोघेही भारतीय जनता पक्षाचेच आहेत.
                ह्या झाल्या टेक्निकल बाबी ..आत्ता जी ब्राह्मणेतर पोरं - पोरी ह्या सगळ्या काँट्रॅव्हर्सि वर गळा काढतायेत त्यांच्यासाठी खास शालजोडे आपण मारावेत हा असा विचार दोन दिवस झाले मनात घोळत होताच त्यालाच शेवटी आकार देताना मनस्वी आनंद होत आहे . 
                आपण हिंदू आहोत म्हणजे नेमके कोण आहोत ?? ह्याचे उत्तर जेव्हा मी शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एकच उत्तर मला मिळते ते म्हणजे , 
                " ब्राह्मण सोडून ज्यात आपण सगळे ,  मराठा , बारा बलुतेदार मंडळी , बुद्ध वगळून मागासवर्गीय जाती जमाती येतात . त्यांना मी माझ्यासकट " काठावरचे हिंदू " मानतो !!" 
कारण , आपल्या हिंदुत्वाच्या व्याख्या ह्या अतिशय लवचिक आहेत . 
ब्राह्मणांच्या सारखे सोहळे-ओव्हळे आपण मंडळी पाळत नाही . आपण हिंदू असून आपल्यातले काही जण गणेश चतुर्थीला मटण - चिकन खातात . काही जण सोमवारी खातात . काही जण पूर्ण नास्तिक आहेत . काही जण हिंदू धर्मांतर्गत वेग-वेगळे संप्रदायाचा हिस्सा असतात . त्या संप्रदायाचे स्वतःचे असे काही नियम आहेत ते नियम ही लोकं पाळतात . काही जण दान धर्म करतात काही जण करत नाही . काही हिंदू तर रोज देवाला दिवा शुद्ध लावत नाही . आणि अशी अनेक उदाहरणे आपण बघतो , अनुभवत देखील असतो . हिंदुत्ववादाला सर्वाधिक विरोध हिंदूंचाच का होतो त्याचे हेच गमक आहे .
               सांगायचा मुद्दा एवढाच की , हिंदू ही काही कुराण किंवा बायबल ह्या एका पुस्तकाच्या व्याख्येत बसणारा प्रकार नाही . त्याचा आयाम मोठा आहे . तो धर्म कमी आणि एक जीवन पद्धती जास्त आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . ती सर्वसमावेशक आहे , नव्याला स्वीकारणारी आहे . जुन्याला क्षणात टाकून देऊन पुढे चालणारी आहे . फक्त ब्राम्हणच अशी जमात आहे , ज्यांना हिंदू धर्माला ह्या एक व्याख्येत बांधून ठेवायचे असते . त्यांचा तसा ऐन केन प्रकारे अटापिटा सुरू असतो . 
               " आमच्या हिंदूंच्या मंदिरांच्या सोन्यावरच का हात घातला ??? मशिदी , चर्चेस तुम्हाला दिसत नाही का ??? " हा प्रोपोगंडा त्याचाच भाग बर का !!! 
               आज जे ब्राह्मण सोडून बहुजनांची पोरे ह्या हिंदू राष्ट्राच्या प्रोपौगंडया मध्ये येत असतील त्यांना एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे . एकदा का ह्यांचे हिंदूराष्ट्र झाले की  , चातुर्वर्ण्य व्यवस्थेत तुमच्या ढुंगणाला परत खराटेच बांधले जातील हे लक्षात ठेवा ..!! 
जसे हाल ह्यांनी तुमच्या पूर्वजांचे केले तसेच ते तुमचे करणार हे लक्षात घ्या !! 
त्यामुळे ह्यांच्या हिंदू राष्ट्र , हिंदुत्ववाद ह्या प्रोपौगंडयाला अजिबात बळी पडू नका . खरे हिंदू हे सर्वसमावेशक असतात , ते पुरोगामी असतात.  तसे जर नसते तर , अद्यापही सती ची चाल आणि बालविवाह प्रथा ह्या चालूच राहिल्या असत्या हे लक्षात घ्या ...!! 
मी व्यक्तिशः पृथ्वीराज चव्हाणांच्या मुद्द्याशी सहमत आहेच !!
जे नुसते सोने तिजोरीत पडून आहे . ते सोने घाण ठेवून जर त्याने जाणारे जीव वाचणार असतील .. आणि ते जीव कुठल्याही धर्माचे का असेना !! मला त्याबद्दल एक हिंदू म्हणून काही आक्षेप नाही . आणि जर मला हिंदू म्हणून तसा आक्षेप असेल तर , मी मुळात हिंदू नाहीच !! 
हिंदुत्ववाच्या व्याख्या काय फक्त RSS आणि BJP च ठरवणार काय ?? धर्म हा काय कुणाच्या बापाची जहागीर नसते आणि हिंदू धर्म तर त्याहून नाहीच नाही !!!
तुकाराम महाराज ह्यांनी ज्या प्रमाणे वेद सर्वसामान्य लोकांना उलगडून दिले . तसेच " हिंदू " ही व्याख्या आपल्याला सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या काळात उलगडून सांगावी लागणार आहे . ह्याबाबतीत माझ्या मनात दुमत नाही .
......✍️निखिल सुभाष थोरवे
                                    

Comments