नवीन वर्ष , गिरगुटकाला आणि आपण



नवीन वर्ष हे कोऱ्या कागदाप्रमाणे..!! 
आधीच्या कागदावर गिरगुटकाला केला म्हणून , रागाने बोळा करून तो कागद कचऱ्याच्या पेटीत टाकून  
                        "  जसे,काही झालेच नाही !!  " 
अश्या अविर्भावात नवीन कोरा कागद घेऊन पहिली चार वाक्य चांगली लिहून पुन्हा कंटाळा आला की ,  तोच गिरगुटकाला करणे..!!

हे गिरगुटकाल्यावाले तेच , जे नवीन वर्षात वाईट गोष्टी सोडण्याचे आणि चांगल्या गोष्टी सुरू करण्याचे ठरवून 5 दिवसात ढुस्स होतात . 

त्यात , थोड्या फार फरकाने आपण सर्वच जण येतो बर का ..!! 
मुळात संकल्प करायला वेगळे काही करावे लागत नाही . 
त्याच्यासाठी लागते ती , अंतःस्थ प्रेरणा ..!! 

आणि , अश्या गोष्टी करायला आपल्याला 1 जानेवरीची वाट बघावी लागत असेल तर , समजून घ्या 
आपल्या आयुष्याचा गिरगुटकाला अटळ आहे ..!! 

आणि हो ,  
       पुढच्या वेळेस नवीन कोरं कागदच नाही भेटला तर ...???? 

त्यामुळे, 
2021 जिंदाबाद...!! नवीन कोरा कागद जिंदाबाद..!!

.....✍️ निखिल सुभाष थोरवे 

Comments