गुंगीचे औषध आणि निर्बुद्धपणाचा कळस..!!

गुंगीचे औषध आणि निर्बुद्धपणाचा कळस..!!

अजब कालखंडातून आपण सध्या आपण जातोय . " करोनाची लढाई आपण नक्कीच जिंकू !! " हा आशावाद धरून बसणारे आपण आत्ता " करोना सोबत जगायला शिकले पाहिजे " असा सूर आवळतोय . गेल्या अनेक महिन्यांच्या "लॉक डाऊन " ने नेमके काय साधले ?? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेच . 
दिवसेंदिवस पेशंट ची संख्या हनुमानाच्या शेपटी प्रमाणे वाढतच आहे . तिथे अमुक घावला...तो वारला...वैगेरे चर्चा आत्ता आपल्या घराच्या उंबरठया पर्यंत पोहोचल्या . 

जॉब जाण्याच्या , धंदे बुडण्याच्या भीतीने तरुण पोरं घराच्या बाहेर पडतायेत आणि नकळत आपले आई वडील , आजी आजोबा यांना करोनाची लागण करतायेत . जेष्ठ नागरिक आणि जुनाट आजार असलेले आणि काही प्रतिकार शक्ती कमी असलेले लोकं ह्या आजाराला हकनाक बळी पडत आहेत . आणि दुर्दैवाने मृत्यू पावत आहे . माणूस गमावण्या सारखे दुःख खचितच असेल बहुदा .....

देशाचा GDP हा शुन्यापेक्षा खाली पोहोचला आहे . ह्याला सरकार करोनाचे गोंडस कारण देईल सुद्धा पण त्याआधीच सरकारच्या आर्थिक धोरणांची कत्तल झाली होती हे त्रिवार सत्य आहेच .. हे सगळे होत असताना मा .पंतप्रधान मोरांशी खेळण्यात बागडण्यात व्यस्त आहेत . 
अर्थमंत्री करोनाला Act of God म्हणून दैवी वलय प्राप्त करून देत आहेत . तर जनता त्या मावशीचा 1800 चा हिशोब करण्यात व्यस्त आहे . 

मीडिया ने ताळतंत्र तर केव्हाच सोडले . सुशांत सिंग राजपूत हा एकच सध्या देशात महत्वाचा मुद्दा आहे . मीडिया न्यायव्यवस्थेला एक समांतर खटलाच जणू चालवत आहे . किळस यावी इतका प्रकार टोकाला गेला आहे . 

16 तारखेपासून IPL येईल . 10-50 लावून शे-दोनशे जिंकायची स्वप्ने बघून पोर Dream11 खेळतील. आणि IPL सुरु झाले एक भले मोठे गुंगीचे औषध प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मारले जाईल . आणि सगळे एकजात बेशुद्ध होऊन पडतील . 

आधी टिकटॉक आणि आत्ता पब-जी बॅन झाल्यामुळे पोरांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल . त्यामुळे सरकारला त्या पोरांना जॉब बघणे किंवा ह्या दोन्ही गोष्टी पुन्हा सुरु करणे ह्या पैकी एक निर्णय घ्यावा लागेल . 
मागच्या नोटबंदी सारख्या निर्णयांकडे बघून ह्या "दोन्ही " गोष्टी पुन्हा सुरु होतील ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही . कारण बेरोजगारांना रोजगार देणे हे खूप अवघड आहे . ऍप्लिकेशन बॅन करण्यापेक्षा..!! त्यामुळे लवकरच तो निर्णय होईल काळजी नसावी टिकटॉक स्टार आणि पब जी योध्यानों !! 

मंदिरे उघडण्यासाठी विरोधी पक्ष आंदोलन करतोय . शाळा कॉलेजस् कधी उघडायचे ह्याबद्दल कुणी चकार शब्द काढत नाही . केंद्राला तर बिहारच्या इलेक्शन चे येड कधीच लागले . 
सनातनी लोकं अयोध्ये नंतर मथुराची भाषा करीत आहे . काँग्रेस बद्दल काही लिहणे म्हणजे तुमचा चांगला असलेला मूड खराब करण्यासारखे त्यामुळे सध्याच्या परिस्थिती मध्ये मी तसं करू इच्छित नाही . 

असा सगळा मामला बघून देशाची जबाबदारी "सोनू सूदच " बघू शकतो . ह्या मतावर जनता येऊन पोहोचली तर नवल नसावे. 

अवघड..ऐ...भो..!!! 
____✍️निखिल सुभाष थोरवे

Comments