उलटी गंगा..!! आणि सरकारचा अजब धंदा..!!

कोरोनाची लढाई एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे . एखादा अवघड चढ एखाद्या सायकल स्वाराने जोरदार पॅडल मारून धापा टाकून चढावा आणि ऐन मोक्याच्या क्षणी चढ संपत आल्यानंतर त्याच्या सायकलची चैन निसटून पडावी असाच काहीसा प्रकार सध्या बघण्यास मिळत आहे .
                  गेला..गेला म्हणत कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढतोय . आणि सरकार पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने लॉकडाऊन , निर्बंध , लोकांची बेफिकरी या बाबींवर घसरत सावरू पाहत आहे . कोविड मुळे कंबरडे मोडलेल्या लोकांना पुन्हा एकदा लॉकडाऊन ची भीती दाखवून नियम पाळण्यास प्रवृत्त केले जात आहे . अर्थात नियम-अटी पाळणे ह्यात गैर काहीच नाही . पण , तुम्ही उलटी गंगा हिमालयाकडे फिरवू शकत नाही ह्या बाबीचा सरकारला विसर पडला आहे की काय ?? ह्याचे आश्चर्य वाटते .
कोरोनावर औषध नाहीच ... अर्थात ते आधी सुद्धा नव्हते .
मास्क वापरणे , सोशल डिस्टनसिंग ...वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे ह्या गोष्टी जनता त्यांना झेपेल आणि जमेल एवढ्या पद्धतीने पाळत आहेच . कारण , जिथे पोटा-पाण्याचा प्रश्न असतो तिथे ह्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात .
पण , जवळ जवळ गेल्या वर्षभरात एक आश्वासक बदल ह्या सगळ्यात गाठला गेला तो म्हणजे , कोरोनावर शोधण्यात आलेली लस..!! आत्ता ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेंथ वर किती प्रभावी आहे . हा संशोधनाचा विषय जरी असला तरी सरकारने कोणतीही अधिकृत भूमिका घेतली नाही हे विशेष ..!! ह्याचाच अर्थ सगळं सुरळीत आहे आणि असे जर असेल लवकरात लवकर लसीकरणास प्रारंभ होयलाच हवा.

मुळात शोधलेल्या लसीकडे साफ दुर्लक्ष करून , लोकांना पुन्हा एकदा नियम-अटी-निर्बंध पाळायला लावणे आणि किमान तशी अपेक्षा करणे हे हिमालयाकडे उलटी गंगा घेऊन जाण्याचा प्रकार म्हणावा .

स्वतःच्या आईला मार्केटिंग साठी वापरून घेणाऱ्या नरेंद मोदींनीं भारतात बनल्या गेलेल्या कोविड लसीचे ब्रँडिंग जगभरात तर केले पण , " स्वतःच्या बुडा खालचा अंधार दिसत नाही " अशी मराठीत असलेली म्हण तंतोतंत लागू पडावी अशी स्थिती करून ठेवली .
स्वतःच्या देशात लसीकरणाचा वेग वाढविण्याचे सोडून स्वतःची जागतिक नेता ही प्रतिमा अधिक घट्ट करण्याच्या नादात ब्राझील पासून युरोप आणि जगभरात भारतात बनल्या गेलेल्या लसी वितरित करण्याचा धडका सुरू आहे . हे किती निर्बुद्ध पणाची लक्षण म्हणावे ??

तुम्ही , अगदी खाजगीत प्रत्येकाला प्रश्न विचारा , "  कोरोनाची लस घेणार का ?? " हा प्रश्न विचारल्यानंतर सकारात्मक उत्तर किती जण देतील ..!! ह्यावर , सध्याच्या प्रॉब्लेम वरील उत्तर दडले आहे .

कोरोनाच्या लसी बद्दल अनेक समज गैरसमज आहेत ते वेळीच दूर करण्याची आवश्यकता आहे . फक्त फोन वर कॉलर ट्यून बदलून ते गैरसमज दूर होणारे नाहीत . त्यासाठी भरीव प्रयत्न करण्याची गरज आहे . आणि त्यात फार काही रॉकेट सायन्स आहे अशातला देखील भाग नाही . उत्तर अतिशय सोप्पे आहे . जनतेच्या मनात कोरोनाच्या लसीबद्दल जागरूकता , विश्वास निर्माण करणे आणि लसीकरणाची लोकचळवळ उभी करणे !!

अगदी इतिहासात जाऊन बघा कोल्हापूर संस्थानात 1810-11 मध्ये प्लेग च्या शेवटच्या टप्प्यात प्लेग वरील लस उपलब्ध झाली . ती लस टोचून घेण्यास लोक घाबरीत म्हणून राजश्री शाहू महाराजांनी स्वतः सह आपल्या संपूर्ण राजपरिवारास आणि दरबारातील अधिकाऱ्यांना लस टोचून घेऊन लोकांची लसीबद्दलची भीती दूर केली .
1810 चा काळ आणि आत्ताचा 2021 चा काळ काय फरक आहे सांगा ??
जर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सर्व जगासमोर स्वतःला कोरोनाची लस टोचून घेऊ शकतात किंवा रशियाचे ब्लामादीर पुतीन किंवा इतर राष्ट्राध्यक्ष हे करू शकतात तर नरेंद्र मोदी का करू शकत नाहीत ??
लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारच देश पातळीवर हाताळत असल्याने सर्व दोष निर्विवादपणाने केंद्र सरकार वरच येतो . त्यामुळे कोणत्याही राज्य सरकारला त्याचा दोष देता येणार नाही . दुर्दैवाने त्यांच्या हातात हिमालयाकडे उलटी गंगा पाठविण्याची कामगिरी उरली आहे .
मोदी आणि केंद्र सरकारला स्वतःची शेखी मिळविण्यासाठी लसीकरण मोहीम भारतात वेगवान मुळात होऊनच द्यायचीच नाही ही खरी गोम आहे .
सरकारने ठरवलेच तर मोदींपासून , सचिन तेंडुलकर , अमिताभ बच्चन पर्यंत ते विराट कोहली किंवा शाहरुख खान पर्यंत सर्वांनीच लस घेतली तर किती व्यापक प्रमाणात लोक जागृती शक्य आहे ..!! प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ह्यात समाविष्ट करून घेता येईल आणि लसीवरील विश्वास वाढवता येईल . लसीकरण खऱ्या अर्थाने लोकचवळ बनली तरच कोरोनाच्या विरुद्ध आपली लढाई आपण निर्णायक टप्यात नेऊ शकू .. !!
गरज आहे निष्पाप जाणाऱ्या जीवांचे मोल जाणण्याचे आणि स्वतःच्या प्रेमात पडलेल्या सर्वसत्ताधीश लोकांनी जनतेप्रति ममत्व भाव ठेवण्याची..!!
कारण , तुम्ही हिमालयाकडे परत पाठवू पाहणारी ही गंगा परत तर जाणार तर नाहीच पण , जनता एकदा चिडली की , अशी तुमच्या दांडीत घुसेल की , पळता भुई थोडी होईल .
......✍️ निखिल सुभाष थोरवे
मो.9764796699.

Comments

Post a Comment