शिवजयंती तारखेनुसार होण्याचे फायदे आणि तिथी नुसार होण्याचे तोटे
सनातनी , कर्मठ , विशिष्ट वर्गाच्या लोकांनी कधी बहुजन समाजाचा राजा मनापासून स्वीकारालाच नाही. उलट त्यांनी राजावर प्रभुत्व गाजवण्याची एकही संधी सोडली नाही .. कधी गुरू म्हणून डोक्यावर बसून आपल्या राजाला दुय्यम स्थान दिले , तर खुद्द शिवपुत्र शंभू राजांची ह्ययात असताना आणि हयात नसताना देखील अखंड बदनामी केली
तिथी नुसार शिवजयंती त्याचाच एक भाग !! जो जाणीवपूर्वक पेरण्यात आला .. आणि व्यापक प्रमाणात समाज मान्यता मिळविण्यात यशस्वी देखील दुर्दैवाने झाला. अगदी तुमच्या सारखा मी देखील तिथी नुसार शिवजयंतीच्या बाजूने कट्टरपणे उभा राहायचो ... पण नंतर ह्या मधील फोल पणा आणि सनातनी कावा लक्षात आला . खूप दिवसापासून हे विचार मनात घोळत आहे त्यामुळे हे मुद्दे मांडतोय , कदाचित तुमचे विचार भिन्न असू शकतील पण जे मांडतोय त्याचा नक्की विचार तुम्ही करणार ही अपेक्षा . (आज काल रोजच शिवजयंती साजरी केली पाहिजे अश्या आशयाच्या पोस्ट फिरत असतात . त्यातील व्यावहारिक किती आहे हे ज्याचे त्याने ओळखावा . )
१ ) शिवजयंतीच्या तारखेचा वाद उभा राहिला .. आणि गेल्या 100 वर्षांपासून तो जाणीवपूर्वक चिघळत ठेवला गेला .. त्याचा परिणाम , अजूनही देशपातळीवर शिवजयंतीला सुट्टी नाही , जी की , असायलाच हवी होती
२) विश्वव्यापी , विश्ववंदनीय शिवछत्रपती केवळ महाराष्ट्रापुरते आणि आत्ता तर जाणीवपूर्वक मराठा समाजपुरते मर्यादित ठेवण्याचे धोरण आखले गेले
३) येशू ख्रिस्त , ख्रिश्चन धर्म ह्याचा प्रसार का झाला कारण तारीख एकच आहे 25 डिसेंबर !! जी जगमान्य आहे म्हणून त्या विचारांचा विस्तार विस्तार जगभर झाला . विचार करा 350 वर्षे जरी सोडून दिली तरी गेल्या 70 वर्षात शिवविचारांचा किती प्रसार करणे शक्य झाले असते !! तारीख एक असती तर , जगभर शिवछत्रपत्तींचा प्रसार झाला असता
आत्ता तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी पुढील कारणे देतात ती बघू ,
१) शिवजयंती आमचा सण आहे , आणि सण हे तिथीनुसारच साजरे झाले पाहिजे !!
मुळात शिवजयंती हा सण नसून मराठी , आणि महाराष्ट्रच्या स्वाभिमानाचा हुंकार , गर्जना आहे आणि जर गर्जना नभात गर्जून द्यायची असेल तर जगाला समजेल अश्या भाषेत द्यायला हवी !!!
जर आपल्याला शिवचरित्र , छत्रपती जर जगभरात पोहोचवायचे असतील तर , शिवजयंती तारखेनुसार साजरी करण्याचा हट्ट हा धरलाच पाहिजे ...
मित्रांनो सनातनी कावा ओळखा !! आणि वेळीच सावध व्हा !!
आपल्या राजाला महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका .. देश पातळीवर आणि मग जगाच्या पातळीवर नेण्याची जबादारी आपली आहे !!
.....✍️निखिल सुभाष थोरवे
👌👌 ekdum barobar
ReplyDelete