हत्या , आत्महत्या आणि राजकारणाची गटारगंगा
आपल्याकडे प्रत्येक गोष्ट मोजण्याची एकक असतात वजन किलो मध्ये , द्रव पदार्थ लिटर मध्ये आणि एखाद्या घटनेचे मूल्य निवडणुकांमध्ये !
सुशांतसिंग राजपूत ची हत्या होती की आत्महत्या हे काळानुसार समोर येईलच . पण त्याआधी जी चिखलफेक होत आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रात खूप मोठी अराजकता माजलीये . असं चित्र उभे केले जात आहे , ते किळसवाणे आहे .
मुंबई सारखे शहर सुरक्षित नाहीये अश्या प्रकारची वक्तव्य सुप्रसिद्ध आणि गोड गळ्याच्या गायकांच्या माध्यमातून केली जात आहे . आणि ज्या गुन्हेगारीसाठी बिहार सारखे राज्य कुप्रसिद्ध आहे अश्या राज्याच्या पोलिसांकडून मुंबई पोलिसांना उपदेशाचे डोस चमच्याने पाजले जात आहेत .
श्वान तुलनीय गोदी मीडिया तश्याच प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात व्यस्त आहेच . पण हे सगळे होत असताना नरेंद्र दाभोलकर , कॉम्रेड गोविंद पानसरे , कलबुर्गी आणि गौरी लंकेश ह्या प्रकारच्या हत्यांबद्दल ह्या मीडिया ने वातावरण निर्मिती कधी केली असलेली आपण पहिली का ???
का ती लोक मीडियाच्या मालकांच्या विरुद्ध विचारसरणीची होती म्हणून ??
की , त्यावेळेस कोणत्या निवडणुका नव्हत्या म्हणून ??
की , त्या लोकांचे कार्य सुशांतसिंग राजपूतच्या फिल्मी कारकिर्दीपेक्षा खुजे होते ??
महाराष्ट्रात अनेक मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित संकटे आणि प्रश्न पिंगा घालत असताना अश्या प्रकारचे राजकारण होणे हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभनीय नाही आणि लोकांना फारसे ते आवडत देखील नाही .
बाकी , सर्वसत्ताधीश केंद्राने सर्व लहान-मोठे पेंग्विन दोषी असतील तर आत टाकावे .नाहीतरी , सर्वोच्च न्यायालयाने पिंजऱ्यातील पोपट म्हणून गौरव केलेली यंत्रणा तुमच्या मदतीस आहेच .
पण , महाराष्ट्राच्या उज्वल आणि बलदंड पोलीस दलाला आणि कायदा सुव्यवस्थेला बिहारशी तुलना करून अपमानित करू नये .
.....✍️निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment