बाकी सब फर्स्ट क्लास है..!!

बाकी सब फर्स्ट क्लास है ..!! 

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान दृष्टीक्षेपात आहे. यंदाची निवडणूक ही १००% मोदी खिश्यात घालतील अशी स्थिती आहे. त्याची काही शॉर्ट आणि स्वीट कारणे मी सांगतो.

१) विरोधक करत असलेली लोकशाही धोक्यात आहे ही टीका , लोकांना अजिबात भावलेली नाही.

विरोधी पक्षाचे नेते जेल मध्ये डांबले , विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडी , सीबीआय अश्या चौकश्या लागल्या म्हणजे लोकशाही धोक्यात आली आहे . हे विरोधी पक्षांचे नरेटिव्ह लोकांना स्ट्राईक होत नाही. उलट जे जेल मध्ये गेले ते त्यांच्या कर्माने गेले असे लोकं म्हणतात.

जोवर , लोकांच्या खाणे , पिणे , फिरणे , कपडे घालणे यांवर थेट काही आघात होत नाही . तोवर लोकं निवांत आहेत आणि राहतील.

२) इंडिया आघाडी हे सत्तापिपासू लोकांचे कडबोळे आहे हे भाजपने अत्यंत नियोजनबद्ध पटवून दिले आहे . त्यामुळे एकसंघ राष्ट्र , एक नेतृत्व , एक पार्टी या गोष्टी भाजपला अतिशय सोप्पे जात आहे . 

उदा: वर्षाला एक एक पंतप्रधान करतील ही मोदींची टीका.

३) बाकी आर्थिक दृष्ट्या फार वाईट स्थिती आहे , अशी भारत देशाची परिस्थिती नाही . 

मात्र ; रोजच्या 2 GB इंटरनेटच्या डोस मध्ये , तरुण पिढी गुंगली आहे.

बाकीचे ड्रीम 11 वर टीम बनविण्यात व्यस्त आहे.

त्यामुळे संताप , उठाव , राग वैगेरे असा काय तरुण पिढी चा विषयच नाही . 

फक्त वाईट एकच वाटते.

भाजपने नीतिमत्ता सोडून , पक्ष फोडणे , भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना पक्षात घेणे . प्रस्थापित राजकीय घराणी गोंजारणे , अनैसर्गिक आणि अनैतिक पक्षप्रवेश हे टाळायला हवे होते.

पूर्ण मेरिट वर मूळ भाजपचा कार्यकर्ता मोठा होयला हवा होता. पण ; दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

बाकी सब फर्स्ट क्लास है ..!! 

.....✍🏻 निखिल सुभाष थोरवे 


Comments