सुप्रियाताई , हे असे नसते...!!

सन्मानीय सुप्रिया ताई , 

सप्रेम नमस्कार..!! 

" नाती वेगळी ... राजकीय भूमिका वेगळी " ह्या गोड गोंडस सबबीखाली तुम्ही जर जनतेला आणि सर्वांत वाईट म्हणजे , स्वतःच्या मागे आलेल्या कार्यकर्त्यांना मूर्खात काढत असाल तर , तुम्ही तुमची उरलीसुरलेली विश्वासहर्ता गमावत आहात . 

महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातील गावात तुम्ही जावा , अगदी जमिनीचे , बांधाचे वाद असतील तर , सख्खा भाऊ पक्का वैरी झालेले तुम्ही बघाल हीच वास्तविक जनरीत आहे. पवार कुटुंब काय आभाळातून पडलेले नाही . किमान लोकांना पटेल , रुचेल अशी तरी किमान भूमिका घ्या...!! 


अगदी , अजित पवारांचा पक्षावर , पक्षाच्या चिन्हावर दावा सांगणे , मोठ्या पवार साहेबांना तासनतास निवडणूक आयोगासमोर बसवून ठेवणे. जाहीर सभेत तोंडसुख घेणे . भर सभेत एकमेकांना टाळणे ही अशी नौटंकी करून , तुम्ही आख्या महाराष्ट्राला " नाती वेगळी आणि राजकीय भूमिका वेगळी " अशी अक्कल शिकवत असाल तर , कुणालाही न पटणारी आहे . 

अर्थात , मला ह्या गोष्टींचे अजिबात आश्चर्य वाटत नाही कारण , हे सर्व पवारांचेच कारस्थान आहे माझ्यासह अनेक जणांचे मत आहेच..!! तसा लेख माझ्या फेसबुक वॉलवर तारीख , टायमिंग सह उपलब्ध आहेत . 


मात्र , मला वाईट मात्र ह्या बंडाला खरे समजून , राष्ट्रवादी काँग्रेस मधील तिसऱ्या आणि चौथ्या फळीमधील तथाकथित युवा नेत्यांचे वाटते. कोणताही जनाधार नसलेले हे नेते खुश होते की , राष्ट्रवादी मधील निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा आपण फायदा करून घेऊ आणि पक्षामधील आपले स्थान अधिक भक्कम करू ..!! ह्यांच्या नौटंकी ला भुलून अगदी रोहित पवारांसारखा तरुण नेता सुद्धा युवा संघर्ष यात्रा काढतो हे किती हास्यास्पद आहे . 

तरी , बरे रोहित पवारांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या नावाखाली बारामती मधील दिवाळी टाळली आणि आपली राजकीय गोची सुद्धा टाळली. तशीच गोची डेंग्यू च्या नावाखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा टाळली . शेवटी या नेत्यांना जनतेसमोर , कार्यकर्त्यांसमोर जावे लागते. 


तेव्हा , सुप्रिया ताई जर खरेच अजितदादांचे बंड खरे असेल तर प्रत्येक पातळीवर ते निभवा कारण ; जनतेला , स्वतःच्या कार्यकर्त्यांना फसविणे अथवा गृहीत धरणे योग्य नाही तुमच्या उरलेल्या पक्षाला त्याचा प्रचंड तोटा होईल . आणि जर बंड नसेल तर ही नौटंकी बंद करा कारण , महाराष्ट्राची राजकीय संबंधाचे इतके अवमूल्यन बघायची जनतेला सवय झाली आहे की , तुम्ही केंद्रात मंत्री झाल्या तर एक मतदार म्हणून मला आनंदच असेल. 


शेवटी , विचारधारा आणि कार्यकर्ते हे कडीपत्ता प्रमाणे  असतात. उकळत्या तेलात आधी टाकले जातात . आणि पूर्ण पदार्थ तयार झाला की , काढताना पाहिले बाहेर टाकले जातात. हे आम्हा सर्वांनी मान्य केले आहेच..!! 

कळावे ; 

आपला सर्वसामान्य मतदार 

.......✍️निखिल सुभाष थोरवे 

 




Comments