द काश्मीर फाईल्स - For Mases Not For Thinkers

अंत्यत गाजावाजा झालेला द कश्मीर फाईल्स बघितला . मला आठवतंय २०२० साली विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ' शिकारा ' हा काश्मिरी पंडितांवर आधारित चित्रपट बघितलेला तेव्हा त्यावर , ६ एप्रिल २०२० रोजी चित्रपट समीक्षण मी लिहले होते . त्याची लिंक याच लेखासोबत जोडत आहे . त्यात काश्मिरी पंडितांच्या बद्दलच्या आणि त्यांच्यावर झालेल्या अमानवी अत्याचार आणि त्याला कारणीभूत असलेल्या मंडळींचा येथेच्छ समाचार मी त्यावेळेस घेतला होता. तो आत्ता पुन्हा इथे सांगत बसून लेखाची लांबी वाढवू इच्छित नाही.

लिंक -  https://m.facebook.com/story.php?story_fbid=3641618752575253&id=100001814939044

मला व्यक्तिशः कश्मीर फाईल्स "ओव्हर रेटेड " वाटला. कश्मीर फाईल्स हा ' मासेस ' साठी बनवलेला चित्रपट आहे,थिंकर्स साठी नाही. 
चित्रपटात मुद्दामून डीबेट सारखी परिस्थिती निर्माण करून , कश्मीर पंडितांचे धर्मांतर , प्रचंड चीड आणणारा नरसंहार , विस्थापितांचे जगणे , मीडियाचा दुटप्पीपणा , राजकारण असे अनेक विषय हाताळले जातात. मात्र त्यावर चर्चेपालिकडे काही हाती लागत नाही.
त्याच , स्वतः प्रचंड वैचारिक गोंधळात असलेल्या नायक आणि त्याला सातत्याने आझादी-आझादी च्या नावाखाली भडकवणारी त्याची प्रोफेसर मेमन यांच्या द्वारे हा चित्रपट पुढे सरकतो. 
जेनयू सदृश मोठ्या विद्यापीठात शिकणाऱ्या आणि प्रचंड गाढा अभ्यास असणाऱ्या नायकाचे दोन दोन तासांच्या अंतरात हिंदू आणि मुस्लिम अश्या दोन्ही बाजुंनी होणारे ब्रेन वॉशिंग हे हास्यास्पद वाटते. 
चित्रपटाच्या शेवटाला फिल्मी स्टाईलचे " हिंदूंचे काश्मीर " असे नरेशन सेट करणारे भाषण मात्र उत्तम जमून आले आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने वेटेज पण आहे.
चित्रपट हिंदुवर झालेल्या अन्यायाचे सविस्तर मांडणी  करीत असताना , कट्टरतावादी मुस्लिमांनी पंडितांवर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात मुठी आवळ्या तर जातात मात्र , त्यातून सोल्युशन मात्र निघत नाही. 
चित्रपटाच्या  शेवटला , जेव्हा कश्यप पंडिताची राख त्याच्या पडक्या घरात विखरली जाते. आणि त्याचा मित्र ब्रह्मभट्ट , " मी तुला दिलेले वचन पूर्ण केले , तू नाही किमान तुझी राख तरी मी तुझ्या घरी आणली " तेव्हा ,  
३० वर्षांपासून प्रलंबित कश्मीर पंडितांचे त्यांच्या मूळ घरी परत जाण्याचे स्वप्न हे कलम ३७० लागू करून सुद्धा अजूनही स्वप्नच आहे हे अधोरेखित होते. 

केवळ मुस्लिमांनी हिंदू पंडितांचा केलेला नरसंहार बघून , मनात द्वेषाची भावना ठेवून आणि मुठी आवळून जर , तुम्ही सिनेमा हॉलच्या बाहेर पडत असाल तर , ज्या हेतूंनी हा चित्रपट दिग्दर्शकाने बनवला आहे आणि ज्या अजेंड्याखाली या चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार केला जातोय तर , अश्या लोकांचा उद्देश तुम्ही पूर्ण करीत आहात . हे मात्र १०० % खरे आहे . 

माझ्या मते , द कश्मीर फाईल्स या चित्रपटाने जुन्या जखमा उकरून काढण्याऐवजी काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने काही ठोस भूमिका अथवा मांडणी केली असती तर , चित्रपट अधिक परिणामकारक झाला असता. मात्र , भारतात २०१४ पासून , प्रोडकटिव्ह ऐवजी डिस्ट्रिक्टटिव्ह गोष्टीलाच अधिक जनमताचा पाठिंबा मिळतो हे आत्ता सद्सद्विवेक बुद्धी शाबूत असणाऱ्या मंडळींच्या चांगलेच अंगवळणी पडले आहे . ही दुर्दैवाने हीच वस्तुस्थिती आहे.

✍️निखिल सुभाष थोरवे 

Comments