उठा मराठ्यांनो..!! आपल्या राजाला साथ द्या...!!

संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणाला बसले आहेत.   मराठा आरक्षणाचा लढा हा दीर्घकालीन गुंतागुंतीच्या न्यायालयीन प्रक्रियेत जरी अडकला असला तरी , 
मराठा समाजाच्या काही न्याय मागण्या बऱ्याच प्रलंबित आहेत त्यामध्ये , सारथी संस्थेला निधी न देणे , कोपर्डी प्रकरणातील होणारी शिक्षेची दिरंगाई ,मराठा मुलांच्या वसतीगृहासाठी निधी , अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत राज्य सरकारच दुर्लक्ष , मराठा आरक्षण लढ्यात आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी , तत्कालीन आरक्षणाच्या लाभ घेऊन भरती झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करावी अश्या मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण आरंभले आहे. 
मुळात , मराठा हक्क आणि आरक्षणाबाबत मराठा समाजाची झालेली एकजूट कमकुवत होणे समाजाला परवडणारी नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव तंत्राचा भाग म्हणून ; संभाजी राजे छत्रपती यांचा मार्ग अतिशय योग्य आणि विधायक आहे. 
सर्वसामान्य मराठा तरुणाच्या न्याय हक्कासाठी राजवैभव त्यागून छत्रपती कुळातील व्यक्ती आमरण उपोषणास बसते हा , तमाम मराठा समाजासाठी भावनिक क्षण आहे. आजवर स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर , संबंध मराठा समाजाची शिस्तबद्ध एकजूट करण्याचे कार्य छ. संभाजी महाराज यांनी केले. रयतेच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे असो.. अथवा सारथी , रायगड संवर्धन प्रकल्प या सर्वांमध्ये संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाचा वाटा अत्यंत महत्वाचा राहिला आहे. 
राजकीय पक्ष म्हणून भाजप या उपोषणावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न जरूर करणार , मात्र भाजपची विचारसरणी आणि संभाजी महाराजांची कार्यपद्धती ह्याचा मेळ नक्कीच बसत नाही. किंबहुना , भाजपने राज्यसभा खासदारकी बहाल करून देखील संभाजी राजे यांनी क्वचितच भाजप अनुकूल भूमिका घेतलेली आढलेल. संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका सर्वसामान्य गरीब मराठा समाजाच्या हिताची प्राध्यानाने घेतली आहे. हे निश्चित..!! 
मात्र , आज गेले दोन दिवस झाले. मराठा समाजाकडून संभाजी राजे छत्रपती यांना मिळणारा अल्प प्रतिसाद हा संपूर्ण मराठा आरक्षण चळवळीला निराशामय वातावरणात ढकलणारा आहे. 
असे का होते ?? या गोष्टीच्या खोलात जाऊन मी जेव्हा विचार करतो , तेव्हा ; महाराष्ट्रातील उजवी विचारसरणीच्या संघटना ज्या , रा.स्व. संघाच्या अजेंड्यावर कार्यरत आहेत . ज्याला ,दुर्दैवाने ' दुसऱ्या ' गादीचा देखील पाठिंबा आहे. या संघटनेमधील बहुजन युवक हे चुकीच्या प्रपोगंड्याला बळी पडलेले दिसतात. छत्रपतींची कोल्हापूरची गादी ही नेहमीच पुरोगामी विचार सरणीच्या आणि बहुजनवादाच्या बाजूने भक्कम उभी राहिली आहे. आणि याच गादीचे प्रतिनिधित्व युवराज संभाजी राजे छत्रपती करतात. त्यामुळे या संघटना संभाजी महाराजांच्या आणि पर्यायाने मराठा आरक्षणाच्या बाजूने वातावरण निर्मिती राज्यात होऊन देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा लढा पिचलेल्या आणि समाजाच्या तळागाळातील मराठा युवकांसाठी आहे. याची जाणीव मराठा समाजातील प्रत्येक बांधवांनी उरात ठेवली पाहिजे.  
उठा मराठ्यांनो..!! 
आपल्या राजाला साथ द्या...!! 

Comments