भक्त तेथेचि जाणावा ....!!

भक्त तेथेचि जाणावा ....!! 
लेखक :- निखिल सुभाष थोरवे

स्वानुभवातून मोदी भक्तांची मी शोधून काढलेली वैशिष्ट्ये :- 

भक्तांमधील दोन प्रकार :- 
 
• हिंदुत्ववादी , गोरक्षक :- 

हिंदू संकटात आहे , पाकिस्तानचे , मुस्लिमांचे  आक्रमण रोखायचे आहे . आणि ह्या सगळ्यावर उपाय म्हणून मोदी साहेबच एकमेव तारणहार आहेत . हे एकदम प्युअर मोदी भक्त ह्यांचे मतपरिवर्तन अश्यक ..!! 
 प्रामुख्याने चर्चेतील मुद्दे :- राम मंदिर , गोरक्षा , आयुर्वेद , भारतीय संस्कृती यांचे पुनर्जीवन 

• आय टी वाले आणि गोदी मीडियाचे हिंदी न्यूज चॅनेल बघणारे :- 

विधानसभा , विधानपरिषद , जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य यांच्याशी ह्या लोकांचा संबंध तुटलेला असतो . ही तीच लोकं होती ज्यांना कधीकाळी आमदार कोण आणि खासदार कोण ह्यात कन्फ्युजन होते .
ह्यांच्या बापजाद्यापैकी कुणीही निवडणुकीला उभे राहिलेले नसते . लोकांशी जनसंपर्क  ह्यांचा स्वतःचा नातेवाईक आणि पेपर आणि दुधाची बिले देण्याइतपत असतो . 
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मताचा अवमान , वाचनाचा अभाव  , मोदी मीडियाचा प्रपोगंडा आणि Whatsapp-Facebook University वर ही मंडळी अवलंबून असतात . श्यकतो , आय.टी. सेक्टर मध्ये कामाला असतात . ग्लोबल इशूज वर गप्पा मारत ,  गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन त्यांना बेसलेस वाटते तर , कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेली भयंकर हानी त्यांना ग्लोबल क्रियासिस वाटते . 
ह्यांचे मतपरिवर्तन अश्यक जरी नसले तरी , ही मंडळी रस्त्यावर आल्याशिवाय सुधारायची नाही अशी एकंदर परिस्थिती आहे . 
प्रामुख्याने चर्चेतील मुद्दे :- सर्जिकल स्ट्राइक , कलम 370 , CAA-NRC , सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट , मोदी-ग्लोबल लीडर 


एकंदरीत आपण भक्तांनी घेरले गेलो आहोत . आपली स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवणे हे दिवसेंदिवस हॉस्पिटलमध्ये बेड 
मिळविण्या बरोबर अवघड बनत चालले आहे . 

....✍️ निखिल सुभाष थोरवे 

              

Comments