" मैं नहीं जयकांत , तेरा अहंकार तुझे मारेगा..!! "
" मैं नहीं जयकांत , तेरा अहंकार तुझे मारेगा..!! "
लेखक :- निखिल सुभाष थोरवे
सगळे सुनियोजित होते !!
आधी त्यांना खलिस्तानवादी ठरविण्यात आले . ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले . त्याचा काही फायदा होत नाही म्हंटल्यावर , कृषी कायदे किती शेतकऱ्यांच्या हिताचे (?) आहेत ह्यावर राज्यभर मोहिमा राबिविण्यात आल्या . त्याला अल्प प्रतिसाद मिळतोय हे लक्षात आल्या नंतर चर्चेचे गुऱ्हाळ तब्बल 2 महिने चालविण्यात आले . त्यातुन म्हणावे असे फलित बाहेर पडत नाही असे दिसताच , नेहमीची धोपट वाट केंद्र सरकारने वापरली ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय नियुक्त अहवाल समिती !!
आपल्याकडे एक प्रचलित प्रघात पडून गेलाय कोणताही मुद्दा अमर्याद काळा पर्यंत लांबणीवर टाकायचा असेल तर तो सर्वोच्च न्यायालयात नेला जातो .
बरं , त्या कमिटी मध्ये होते कोण लोक ?? तर ज्यांनी उघडपणे कृषी कायद्यांचे समर्थन केले असे !! त्यामधील एका सन्मानित सदस्यांने तर शेतकऱ्यांच्या विरोधात आता जाऊ शकत नाही म्हणून राजीनामा दिला .
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सुद्धा आंदोलक मागे हटत नाही म्हंटल्यावर , सरकारकडून काल झालेल्या प्रकारची अपेक्षा होतीच..
ज्याला वाकडी वाक्य वाचता येतात आणि बातमी मागची बातमी लक्षात येते अश्या लोकांसाठी कालचा प्रकार अतिशय सोप्पा आणि सुटसुटीत आहे .
3 महिने दिल्ली बाहेर रोखून ठेवलेल्या , शेतकऱ्यांना 26 जानेवारी सारख्या संवेदनशील दिवशी ट्रॅक्टर मार्चला परवानगी देणे . त्यानंतर हिंसाचार घडवून आणून आंदोलन कमकुवत करणे हा सरळ सरळ सरकारचा डाव आहे .
ह्या सगळ्या प्रकारची निःपक्षपाती चौकशी कधीच होणार नाही कारण , सरकारी यंत्रणांचा दुरूपयोग करण्यात केंद्र सरकार एका वेगळ्या उंचीवर गेली आहे . ईडी , सीबीआय सारख्या चौकशी संस्था या श्वान संस्था बनल्या आहेत .
मुळात सरकारला आंदोलन चिरडून टाकण्याची चटक लागली आहे . त्याचे कारण त्यांचा अहंकार ..!! परवाच्या राज्यपालांच्या वर्तनातून तर हे स्पष्टच झाले . शेतकरी आंदोलन हा सरकार साठी मुद्दा नाहीच ..!! एकीकडे देशाचे प्रधानमंत्री कोरोना लसीचे ब्रँडिंग करतात त्यावेळेस गेले 3 महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अवाक्षर देखील उच्चारत नाही . आपण शिख विरोधी नाही हे दाखवण्यासाठी ते गुरुदद्वारात जाऊन फक्त फोटोसेशन करतात .
CRC , NRC आंदोलन जसे दाबण्यात आले तसे , शेतकरी आंदोलन देखील दाबण्यात आपण यशस्वी होऊ !! असा सरकारला विश्वास आहे . त्यामुळे सुनियोजित पद्धतीने आंदोलनाला सर्वसामान्य जनतेची सहानभूती मिळू नये अशी काळजी घेण्यात येत आहे .
गेल्या 6 महिन्यांपासून बिकाऊ मीडिया आणि सरकारी यंत्रणा ह्याला हाताशी धरून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची ज्या माजूरड्या पद्धतीने चेष्टा केली . ती बघता तुमची तळपायाची आग मस्तकात जात नसेल तर तुमच्या धमन्यातील रक्त गोठले आहे असे समजा ..!!
त्यांना काय दाखवायचे आहे तेच जर तुम्ही बघत बसाल आणि तसाच जर विचार करत बसाल तर , आयुष्यभर तुम्हाला चुतीयाच बनवले जाईल .
लाल किल्यावर जे काही घडले त्याबद्दल तुमच्या मनात चीड निर्माण केली जाईल . पण बातमीच्या मागची बातमी वाचाल तर खरी चीड तुम्हाला त्या लाल किल्ल्यावर चढलेल्या तथाकथित शेतकऱ्यांची नाही तर , केंद्र सरकारची येईल .
अजय देवगणच्या सिंघम मध्ये एक सुप्रसिद्ध डायलॉग आहे
" मैं नहीं जयकांत , तेरा अहंकार तुझे मारेगा..!! "
देशाच्या मुळावर उठलेल्या जयकांतला लवकर अद्दल घडो..!! नाहीतर , या देशातून एक नाही , अनेक सिंघम तयार होतायेत आणि त्यांना कोणत्याही वर्दीची गरज नाही .
Comments
Post a Comment