नीट पहा , हे मोदी सरकारच्या चितेचे पाहिले लाकूड आहे ...
प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असती आणि ती गोष्ट योग्य वेळी त्या त्या ठिकाणी अवतरीत होत असते . " काळ प्रत्येक गोष्टीला सर्वोत्तम औषध असतो " , असे म्हणतात .
अनेक ज्ञात आणि अज्ञात प्रशांची उत्तरे काळाच्या पोटात दडलेली असतात . मला आठवतंय , 2014 साली जेव्हा मोदी सरकार स्थापित झाले होते तेव्हा एका पाठोपाठ एक भाजपची लाट निर्माण झाली होती . 2014 लोकसभा इलेक्शन नंतर झालेल्या विधानसभा , स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सर्वांमध्ये भाजप आणि पर्यायाने मोदींचा करिश्मा सुरू होता .
मित्रांमध्ये असताना तेव्हा मी एक वाक्य बोललो होतो , " मोदी आणि भाजपा आत्ता अश्या स्टेज ला आहेत की त्यांना फक्त ते स्वतःच हरवू शकतात . "
आज हा लेख लिही पर्यंत तरी , मोदींना सक्षम पर्याय विरोधकांना सापडला नाहीये .
[राहुल गांधी आणि काँग्रेस ह्या विषयावर सविस्तर लिहिनच ]
आत्ता राहता राहिला मुद्दा ह्या गोष्टींची उजळणी परत का करावी वाटते ?? ह्याचा..!!
कारण , पंजाब आणि हरियाणा ह्या दोन्ही राज्यातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून सरकारला आव्हान देत आहेत. माझ्यामते , हा मोदी सरकारवर पडलेला पहिला घणाघात आहे . जो घणाघात आण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे UPA-2 वर पडला . आणि त्यानंतर काँग्रेसची वाताहात सुरू झाली आणि नंतर बीजेपी साठी एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि मोदींनी ह्याच संधीचा फायदा घेऊन आपली इमेज बिल्डिंग करून स्वतःला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत दाखल केले आणि यशस्वी झाले . अगदी त्याचपद्धतीने हा सर्व प्रकार काळाच्या महिम्यामुळे घडतोय...
मी म्हणणार नाही की , ह्या शेतकरी आंदोलनामुळे सत्ता बदल होईल वैगेरे- वैगेरे ..पण , व्यापक जनाधार मोदी सरकारच्या विरोधात जाण्याची ही नांदी नक्कीच आहे .
त्याचे स्वच्छ कारण असे , कलम 370 असुदे , राम मंदिर निर्माण प्रारंभ असुदे किंवा सर्जिकल स्त्राईक ह्या सारख्या सवंग लोकप्रियता मिळवणाऱ्या निर्णयामुळे जनतेच्या मनात म्हणावी एवढी नाराजी नाही ही वस्तुस्थिती आहे .
बाकी , घसरलेली अर्थव्यवस्था , गाळात गेलेला GDP ह्यागोष्टी जेवढ्या टीकाकार , राजकीय विश्लेषक , अर्थतज्ज्ञ ह्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात तेवढ्या त्या सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या नसतात . हे वारंवार स्पष्ट झाले आहेच .
पण , ज्या शेतकरी बिलावरून NDA चा गेल्या अनेक वर्षांपासून घटक असलेल्या अकाली दलाने भाजपची साथ सोडून दिली .किंवा घमेंडीपणा मुळे हा-हा म्हणता महाराष्ट्र जिंकू म्हणणाऱ्या फडणवीस यांना इतर तीन पक्षांनी घरी बसवले . राक्षसी बहुमताचा दावा करणाऱ्या नितीशकुमार आणि भाजप यांना तेजस्वी यादव यांनी कडवी लढत दिली त्यामुळे ही एकंदरीतच परिवर्तनाची नांदी आहे . असे मला व्यक्तिगतरित्या वाटते .
भाजप आय.टी. सेल बहुतांशी पंजाबी असणाऱ्या शेतकऱ्यांना
" खलिस्तान चळवळीचे समर्थक " असल्याचे भासवत जरी असला तरी वस्तुस्थिती पासून भाजप जास्त काळ दूर पळू शकत नाही . अगदी विकल्या गेलेल्या मीडिया सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला इच्छा नसताना सुद्धा फुटेज द्यावे लागत आहे .
जसा जसा मोदी सरकार ह्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी उशीर करेल तसे तसे व्यापक प्रमाणात सहानभूती शेतकऱ्यांना मिळत जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे . सुरुवातीला अण्णा हजारे यांच्या आंदोलनात जी चूक काँग्रेसने केली तीच चूक भाजप शेतकऱ्यांच्या आंदोलनात करीत आहे हे उघड आहे .
ह्यातून " भाजप शेतकरी विरोधी आहे " हा मेसेज देशभरात पसरतोय ह्याची जाणीव भाजपच्या तथाकथित चाणक्य लोकांनी नसावी ह्याचे आश्चर्य वाटते .
शेतकरी बिलावरून नाराजी असतानाच त्याबरोबर रेल्वे सेवा , संरक्षण सेवा , LIC , Air India ह्या सारख्या आस्थापनातुन निर्गुंतवणुक करून सरकारे खाजगी करणाचा घातलेला घाट हा देशातील विविध घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे .
देश अंबानी आणि अदानी ह्यालोकांसाठी चालवला जात आहे आणि मोदी सरकार कट्टर हिंदुत्ववादी लोकांच्या राक्षसी सुप्त इच्छा पूर्ण करण्याचे साधन बनले आहे .
त्यामुळे , हा सर्व विरोधी विचार प्रवाह पुढच्या 4 वर्षात एकत्रित होऊन मोदी सरकार उलथून लावेल अर्थात स्वच्छ आणि मोकळ्या निवडणूक प्रक्रिया राबवल्या गेल्या तर ....
पुन्हा भेटूच..!!
तूर्तास लेखणीस अल्पविराम..
......✍️निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment