कर्मदरीद्री पणाची काही उत्तम उदाहरणे

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात आर्थिक मंदीची चाहूल लागली होती . सरकार जरी सध्याच्या आर्थिक स्थितीचे खापर करोना महामारी वर फोडत असले तरी त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था गलितगात्र अवस्थेत पोहीचली होती . ही सत्य परिस्थिती आहे . 
" अंडर गारमेंट्स " ची मागणी कमी झाली की , तो एक आर्थिक मंदीचा निकष असतो अश्या प्रकारचा एक लेख वाचनात आला होता . त्याच धर्तीवर ; सध्याचे IPL सामने बघताना एक गोष्ट जाणवत राहते . 
खरं म्हणजे , करोनाच्या काळात रात्री 7.30 वाजताची IPL म्हणजे प्रत्येकाला आनंदाची पर्वणी घेऊन येत आहे . आपल्या गेलेल्या नोकऱ्या , कमी झालेले पगार , बसलेले उदयोग-धंदे यांचा विचार  तेवढ्या पुरता का होईना विचार बाजूला ठेवून प्रत्येक जण IPL बघतोय . 
                     नेहमीच्या IPL च्या जाहिराती आणि ह्या वेळेसच्या जाहिराती ह्यात एक मुलोगामी बदल तुम्हाला जाणवेल . ते म्हणजे जाहिरातींचे बदलेले प्रॉडक्ट ..!! 
                     आधीच्या पेप्सी , कार , पेंट किंवा महागडे कपड्याचे ब्रँड ह्यांच्या जाहिरातींचे प्रमाण जाणावण्या इतके कमी झाले आहे . त्याची जागा Cricket Fantacy Game ह्या गोंडस नावाने पुढे येणाऱ्या , 
Dream11
My11Circle
Myteam11
Gamezy
MPL 
यासारख्या , जुगारी , सट्टेबाज Mobile Application ने घेतली आहे . सट्टेबाजी कितीही अधिकृत केली तरी त्यातला मूळ जुगारी पणा हा नवीन पिढीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे . आधीच नवीन पिढीला जॉब नाहीत . जे शिकत आहेत त्यांची पुढची व्यवस्था काय असेल ?? त्यांच्या परीक्षा होतील का ?? ह्याबद्दल काहीच कुणालाही माहीत नाही . अश्या स्थितीत Dream11 वर मॅच लावून 50-100 रुपये कमविण्यात नवीन पिढीने धन्यता मानली तर त्यात त्यांचा दोष काय म्हणावा ?? 
                     ज्या देशाची अर्थव्यवस्था मरणासन्न अवस्थेत पोहचली आहे . त्या देशात अश्या जुगारी Mobile Application च्या जाहिराती दाखवण्याशिवाय काय पर्याय राहिलाय ?? 
                     ह्यात जाहिरातदार , जाहिरात करण्यासाठी मानधन घेणारे क्रिकेटपटू यांचा अजिबात दोष नाही . मुळात ज्या देशातल्या लोकांकडे योग्य प्रमाणात पैसेच येत नाही ते जुगार खेळण्याशिवाय दुसरे तरी काय करणार ???
                     आंधळ्या माणसाने रेल्वे स्टेशनवर लॉटरी ची तिकिटे विकावीत किंवा एखाद्या दारुड्याने स्वतःला दारू ढोसण्यासाठी घरातल्या वस्तू एक-एक करून विकुन टाकाव्यात अश्या प्रकारे सध्याचे राज्यकर्ते देश चालवत आहेत . 
कर्मदळीद्री पणाचे याहून उत्तम उदाहरण कोणते असू शकेल....???

.........✍️निखिल सुभाष थोरवे 
 
                     

Comments